कृपांच्या गैरकृत्याचे पुरावे समर्थकांनी जाळले ?

March 1, 2012 10:02 AM0 commentsViews: 6

01 मार्च

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशीच्या फेर्‍यात अडकलेल्या कृपाशंकर सिंह यांच्याशी संबंधित कागदपत्रं जाळण्यात आली आहेत. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झालंय. कृपाशंकर सिंह पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

पेपरांची ही साधीसुधी राख नाही.. की शेकोटीची जागा नाही तर ही होळी आहे कृपाशंकर सिंह यांना आलेल्या पत्रांची, लिफाफ्यांची आणि दस्ताऐवजांची. यामध्ये बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या पुराव्यांचासुद्धा समावेश असू शकतो. त्यामुळेच ही जाळपोळ संशयास्पद मानली जातेय. कृपा राहात असलेल्या वांद्र्याच्या साईप्रसाद सोसायटीतल्या मोकळ्या जागेत ही कागदपत्रं जाळण्यात आली. पण असंअसूनही कागदपत्रांच्या या जाळपोळीला मुबंई पोलीस फार महत्त्व देत नसले तरी.

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण अजूनही त्यांना पोलीस हात लावत नाही. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी कृपाशंकर सिंह यांना वेळ देण्यासाठी तर हा खटाटोप सुरू नाही ना, अशी शंक निर्माण झाली आहे.

कृपाशंकर सिंह यांना जोवर अटक होत नाही, तोवर पक्ष निलंबनाची कारवाई करणार नाही अशी भुमिका काँग्रेसने घेतली आहे. त्याचाच फायदा घेत कृपाशंकर अजूनही अनेक महत्त्वाच्या लोकांच्या भेटीगाठी घेत फिरत आहेत.

close