रिक्षाचालकांचा बेमुदत संपाचा इशारा

March 1, 2012 11:44 AM0 commentsViews: 4

01 मार्च

मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेवाढ सध्या टळली आहे. पण पुढच्या महिन्यात 15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनसाडेसात लाख रिक्षा बेमुदत संपावर जाणार आहे. या आंदोलनात 15 लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील सरकारने आमच्याशी खोटेपणा केला यांना धडा शिवण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत असा इशारा कामगार नेते शरद राव यांनी दिला. आज मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीसंदर्भात मंत्रालयात बैठक होणार होती मात्र ही बैठक रद्द करण्यात आली. या बैठकीत टॅक्सीसाठी किमान भाडं 16 रुपयांवरुन 20 रुपये, तर नंतरचं भाडं प्रत्येक किलोमीटरमागे 2 रूपयांनी वाढवावं तसेच रिक्षाचं किमान भाडं 11 ऐवजी 16 रुपये करण्याची युनियनची मागणी होती. मात्र कामगार नेते शरद राव यांनी पत्रकार परिषद घेईन भाडेवाढ पुढे ढकलली. . रिक्षा भाडेवाढीसंदर्भात नेमण्यात आलेल्या पाटणकर समितीचा रिपोर्ट फक्त मंत्र्यांच्या सहीने सादर करण्यात आला त्यावर इतर सदस्यांची सही घेण्यात आली नाही, असा आरोपही शरद राव यांनी केलाय. तसेच रिक्षाची दरवाढ ही राहाणीमानाच्या खर्चावर असायली हवी ती सीएनजीच्या दरावर नको अशी मागणीही राव यांनी केली. त्याचबरोबर आजची भाववाढ पुढे ढकलण्यात येत आहे पण पुढील महिन्याच्या 15 एप्रिलपासून मध्यरात्री सात लाख रिक्षाचालक बेमुदत संपावर जातील या आंदोलनात 15 लाख रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील असा इशारा कामगार नेते शरद राव यांनी सरकारला दिला.

close