छोटा शकीलचा भाऊ अटकेत

November 22, 2008 7:16 AM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबरगँगस्टर छोटा शकिलचा भाऊ सय्यद नफिज अन्वर याला दुबई पोलिसांनी अटक केल्याचं समजतंय. गेल्या काही दिवसांपासून सय्यद दुबई पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहेत. सय्यद हा मुंबई पोलिसांना हवा असलेला एक मोठा आरोपी आहे. त्याच्या विरोधात अनेक गुह्यांची नोंद आहे.सय्यद नफिज हा कुख्यात गुन्हेगार आहे. मुंबईतील विविध पोलीस स्टेशनमध्ये किडनॅपिंग, खंडणी, फायरिंग असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर आहेत. 17 तारखेपासून तो दुबई पोलिसांच्या ताब्यात असल्याचं बोललं जात आहे. मात्र दुबई पोलिसांनी याची अधिकृत घोषणा केलेली नाही. त्याला मुंबईत आणण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत.

close