1 कोटी रु.प्रकरणी रावसाहेब शेखावत यांनी हात झटकले

March 2, 2012 10:12 AM0 commentsViews: 1

02 मार्च

अमरावतीत महापालिका निवडणुकीदरम्यान सापडलेल्या एक कोटी रूपयांच्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. या पैशांवर दावा सांगणार्‍या आमदार रावसाहेब शेखवत यांनी कालच हे पैसे मिळवण्यासंबंधीचा दावा मागे घेतला. काही दिवसांपूर्वीच वित्तराज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनीही या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत हात झटकले होते. आता दोघांनीही प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. महापालिका निवडणुकीच्या काळात 1 फेब्रुवारीला अमरावती इथं पोलीस गस्तीदरम्यान ही 1 कोटी रूपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली होती. मात्र दोघांनीही दावे मागे घेतल्याने या पैशांचं आता काय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

close