आजारातून लवकरच बरा होईन – युवराज

March 1, 2012 12:03 PM0 commentsViews: 2

01 मार्च

फुफ्फुसातील कॅन्सरच्या गाठीने त्रस्त असलेल्या युवराज सिंगवर दुसर्‍यांदा केमोथेरेपी करण्यात आली आहे. पुढची केमोथेरेपी 7 मार्च रोजी होईल असं युवराजनं सोशल नेटवर्किंग साईटवर म्हटलंय. युवराजने आपल्या टिवट्‌रवर याबद्दल टिवट केलं आहे. युवराज सध्या कॅन्सरच्या गाठीवर अमेरिकेत उपचार घेत आहे. सध्या अशक्तपणा वाटत असला तरी लवकरच या त्रासातून बरा होईल असा विश्वास युवराजने व्यक्त केला. भारताचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेनं युवराजची नुकतीच अमेरिकेत भेट घेतली, आणि तो लवकरच बरा होऊन भारतीय टीममध्ये परतेल अशी आशा कुंबळेनं व्यक्त केली होती.

close