कोकणात शिमगोत्सवाची धूम

March 1, 2012 12:12 PM0 commentsViews: 82

01 मार्च

कोकणामध्ये विशेषत: रत्नागिरी जिल्हामध्ये शिमगोत्सवाची धुम सुरु झाली आहे. कोकणात अगदी वेगळ्या पध्दतीने शिमगोत्सव साजरा केला जातो. शिमगोत्सवामध्ये पारंपारीक पध्दतीने होळी लावली जाते. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी अखेरची होळी लावली जाते त्याला होम म्हणतात. यामध्ये पारंपारिक फाकाचे गायन केले जाते.होळी लावल्यानंतर गावकरी हातात काठ्या घेऊन त्या एकमेकांवर मारत प्रदक्षिणा घालतात. पारंपारिक फाकाची धुन कोकणात गावोगावी ऐकू येतेय..' आयनाच्या भायना घेतल्या शिवाय र्‍हाईना ' असं म्हणत पारंपारिक पध्दतीनं बोंब मारुन हा उत्सव साजरा केला जातो. हुताशनी पौर्णिमेला पारंपारिक पध्दतीने कृत्रीम मढं काढलं जातं व ते संपूर्ण गावच्या वेशीवरुन फिरवून होळी वरती टाकलं जातं. त्याला गावची दृष्ट काढणं म्हणतात. गावच्या या शिमगोत्सवाला चाकरमानेही आवर्जून हजर राहतात.

close