लालुप्रसाद यादव यांच्यावर आरोप निश्चित

March 1, 2012 1:20 PM0 commentsViews: 43

01 फेब्रुवारी

कोट्यवधींच्या चारा घोटाळाप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव पुन्हा अडचणीत आले आहेत. पाटण्यातल्या सीबीआय कोर्टाने लालुप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा या दोन माजी मुख्यमंत्र्यांविरोधात आरोप निश्चित केले आहे. 1994 ते 1996 या काळात बिहारच्या अनिमल हजबंडरी विभागाच्या बनावट बिलं तयार करून 46 लाख रुपये काढले होते. या प्रकरणी हे आरोप निश्चित करण्यात आलेत. पण, आपल्यावरचे आरोप पक्षपाती असल्याचा दावा लालूप्रसाद यादव यांनी केला.

close