लंकेच्या विजयाने भारत मालिकेच्या बाहेर

March 2, 2012 12:14 PM0 commentsViews: 1

02 फेब्रुवारी

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर शेवटीची आशा बाळगून थांबलेल्या टीम इंडियाला आता घरी परतावे लागणार आहे. आजच्या श्रीलंका विरुध्द ऑस्ट्रेलिया सामन्यात श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियावर 9 रन्स आणि पाच बॉल राखत विजय मिळवला आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये कुलसेकरानं डेव्हिड हसीची विकेट मिळवत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं. भारताचं भवितव्य या मॅचच्या निर्णयावर अवलंबून होतं. लंकेचा पराभव झाला असता तर भारत फायनलमध्ये पोहोचला असता पण लंकेच्या विजयामुळे सीरिजमधील भारताचे आव्हान आता संपुष्टात आले आहे. 239 रन्सचं आव्हान घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरूवातच खराब झाली. ठराविक अंतराने त्याच्या विकेट्स पडत गेल्या. पण वॅटसन आणि डेव्हीड हसीने शानदार रन्स केले. त्यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियालाच्या आशा काही प्रमाणात जिवंत होत्या, पण त्या धुळीस मिळाल्या. लंकेच्या मलिंगानं 4 विकेट्स तर कुलसेकरानं 2 विकेट्स घेतल्या. अखेरीस सर्व टीम 230 रन्सवर ऑलआऊट झाली.

close