कृपाशंकर यांच्या पत्नींकडे अडीच कोटींची मालमत्ता

March 2, 2012 6:12 PM0 commentsViews:

02 फेब्रुवारी

कृपाशंकर सिंह यांच्या पाठोपाठ त्यांचे कुटुंबीयही आता अडचणीत आले आहेत. त्यांच्या पत्नी मालतीदेवी यांच्या उत्तपन्नाचीही आता चौकशी होणार आहे. मालतीदेवी यांचं उत्पन्न गेल्या 4 वर्षांमध्ये अडीच कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं इन्कम टॅक्स विभागाने स्पष्ट केलं आहे. त्यात भरातभर मालतीदेवी यांनी इन्कमटॅक्स रिटर्न भरलेच नाहीत. आपलं उत्पन्न कमी असून त्याला इन्कमटॅक्स लागणार नाही असा अर्ज कृपाशंकर यांच्या पत्नी मालतीदेवी यांनी केला होता. मात्र इन्कमटॅक्सनं तो अर्ज फेटाळून लावला. त्यांच्या मालमत्तेबाबतचा अहवाल कोटात सादर करण्यात आला आहे. तसेच मालतीदेवी यांच्या नावाने त्यांचं मुळ गाव असलेल्या जौनपूरमध्ये 8 हजार स्केअर फुटाचं एक कॉम्पलेक्स असल्याचं उघड झालं आहे.

close