मुंबईत लवकरच महिलांसाठी हॉकी अकादमी

November 22, 2008 7:28 AM0 commentsViews: 2

22 नोव्हेंबर, मुंबईराजानंद मोरेभारतीय महिला हॉकी टीमचे माजी कोच आणि चक दे इंडिया फेम मीर रंजन नेगी यांनी चक देप्रमाणे त्यांनीही हार न मानता पुन्हा एकदा नव्यानं मुंबईच्या महिला हॉकीसाठी चक देची घोषणा दिली आहे. मुंबईत ते महिलांसाठी हॉकी अकादमी स्थापन करणार आहेत.'चक दे इंडियानं आणलेली उत्साहाची लाट लवकरच विरून गेली. पण मला महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉकी अकादमी उभारायची आहे. 2014 पर्यंत या अकादमीतून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचा माझा निर्धार आहे' असं मीर रंजन नेगी म्हणाले. फेडरेशनला जरी बॉलिवुडचा फायदा उठवता आला नसला तरी नेगींनी मात्र त्याचाच आधार घेतलाय. अ‍ॅकॅडमीच्या उद्घाटनाला झी टीव्हीवरील सारेगमपा या कार्यक्रमातील स्पर्धकांसह चक दे इंडिया चित्रपटातील स्टारना बोलावून त्यांनी त्याचीच प्रचिती दिली.

close