बोअरवेलच्या खड्‌ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू

March 2, 2012 1:16 PM0 commentsViews: 1

02 मार्च

उस्मानाबादमधल्या उमरगा तालुक्यातील कोथळी गावात एका 3 वर्षाच्या मुलाचा बोअरवेलच्या खड्डात पडून मृत्यू झाला. कोथळी गावतल्या एका शेतातील बंद असलेल्या बोअरवेलच्या खोल खड्‌ड्यामध्ये रेहान हा चिमुरडा खेळता-खेळता पडला होता. त्याला वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार प्रयत्न केले. पण रेहानला वाचवण्यात अपयश आलंय. 30 तासांच्या प्रयत्नांनंतर रेहानला बाहेर काढण्यात आलं. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, रेहानला वाचवण्यात दिरंगाई झाल्याचा आरोप आता स्थानिक नागरिक करत आहे.

close