बंगळुरूमध्ये वकिलांचा पत्रकारांवर हल्ला

March 2, 2012 1:19 PM0 commentsViews: 3

02 मार्च

बंगळुरूमध्ये कोर्टाच्या परिसरातच वकील आणि मीडियामध्ये संघर्ष झाला. सिव्हिल कोर्टाच्या परिसरात येण्यापासून वकिलांनी मीडियाला रोखल्यामुळे वाद निर्माण झाला. वकिलांनी पत्रकारांवरच दगडफेक केली. यात अनेक पत्रकार जखमी झाले. हस्तक्षेप करणार्‍या पोलिसांवरही वकिलांनी दगड आणि बाटल्या फेकल्या. बंगळुरू सेंट्रलचे डीसीपी जी रमेशसुद्धा यात जखमी झाल्याचं समजतंय. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आंदोलन करत असलेल्या वकिलांना पत्रकारांनी प्रश्नं विचारल्यानं संतापलेल्या वकिलांनी ही दगडफेक केली.

close