‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशासाठी कलंक’

March 2, 2012 5:35 PM0 commentsViews: 4

02 फेब्रुवारी

विदर्भातल्या शेतकर्‍यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदारांच्या एका समितीने आज यवतमाळला भेट दिली. शेतकर्‍यांच्या आत्महत्यासाठी विदर्भ जगाच्या नकाशावर गाजतंय ही देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे अशा शब्दात या खासदारांनी शेतकर्‍यांसोबत संवाद साधला. पहिल्यांदाच संसदेच्या स्थायी समितीने विदर्भातल्या शेतकर्‍यांशी थेट संवाद साधला. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवांसोबतही 15 जणांच्या या समितीने थेट संवाद साधला. शेतमालाच्या भावाचे प्रश्न समजून घेतले. पंतप्रधान पॅकेजमधून शेतकर्‍यांना लाभ मिळाला की नाही, याची शहानिशाही केली. पुढच्या पाच दिवसात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. येत्या अधिवेशनात या अहवालावर चर्चा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

close