डोंबिवलीत 4 संशयित नक्षलवाद्यांना अटक

March 2, 2012 5:42 PM0 commentsViews: 5

02 फेब्रुवारी

डोंबिवलीच्या गांधीनगर परिसरातून 4 संशयित नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या एटीएस पथकानं ही कारवाई केली. अटक झालेल्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या 4 जणांकडून रोख रक्कम,लॅपटॉप, जप्त करण्यात आला आहे. गांधीनगर येथील न्यु सुर्य-किरण अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमधून या चौघांना अटक करण्यात आली आहे. नालासोपार्‍यातल्या एका व्यक्तीने हा फ्लॅट भाड्याने घेतला होता अशी माहिती समोर आली आहे.

close