संरक्षणमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये हेरगिरी ?

March 2, 2012 5:49 PM0 commentsViews: 3

02 मार्च

संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टोनी यांच्या ऑफिसमध्ये हेरगिरी होत असल्याची बातमी संरक्षण मंत्रालयाने फेटाळून लावली आहे.ऑफिसची नियमित तपासणी झाली. त्यात काही विशेष नव्हतं, असं संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. संरक्षण मंत्र्यांच्या ऑफिसमध्ये हेरगिरी होत असल्याचे 16 फेब्रुवारीला पहिल्यांदा हेरगिरी होत असल्याचं लक्षात आलं होतं. याप्रकरणी गुप्तचर संस्था तपास करत आहे. यापुर्वीही अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या ऑफिसमध्येही अशीच हेरगिरी होत असल्याचं उघडकीला आलं होतं.

close