कृपांच्या पुत्राने मागितली माफी

March 3, 2012 10:08 AM0 commentsViews: 5

03 मार्च

कृपाशंकर सिंह यांच्या मालमत्तेवरील जप्तीच्या कारवाईनंतर काल कृपाशंकर सिंह यांच्या मुलाने मीडियासोबत असभ्य वर्तन केलं होतं. आपल्यांच्या बातम्यांच्या नैराश्यपोटी नरेंद्रने माध्यमांच्या कॅमेरांना मधलं बोट दाखवलं होतं. या वर्तनाबदद्ल नरेंद्रमोहन सिंह यांनी संपुर्ण मीडियाची माफी मागितली आहे. काल जो प्रकार घडला त्याबद्दल मला खेद वाटतोय…आणि जबाबदार नागरीक या नात्याने मला मीडियाच्या स्वातंत्र्याबद्दल आदर आहे. त्यावेळी मी अत्यंत तणावाखाली होतो आणि त्यातून घडलेली ती प्रतिक्रिया होती. आणि मी संपुर्ण मीडियाची माफी मागतो असदेखील नरेंद्रमोहन यांनी म्हटलं आहे. आज सकाळी नरेंद्र मोहन हा आपल्या तरंग बंगल्याच्या परिसरात आला होता. यावेळी पत्रकारांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी मीडियाला टाळलं.

close