यंदा नागलीचं भरघोस पीक

November 22, 2008 7:45 AM0 commentsViews: 15

22 नोव्हेंबर, मोखाडासुभाष सोनकांबळेडोंगर दर्‍यात पिकणारं आदिवासींचं महत्वाचं पिक म्हणजे नागली .हे पीक एक उत्तम, पोषक आहार ठरतयं. यंदा नागलीचं भरघोस पीक आल्यानं ठाणे जिल्ह्यात या कनसरीची पारंपरिक पद्धतीनं पूजा केली जातेय.जनाबाई प्रत्येक वर्षी आपल्या शेतात नागलीचं पीक लावतात. वारली भाषेत नागलीला 'कनसरी' म्हणतात. जनाबाईंसाठी ती फक्त नागली नाही तर तिचं कुलदैवत आहे. म्हणून तिच्यासाठी ती ऊनवार्‍याची पर्वा करत नाही. इतर शेतकर्‍यांची अवस्थाही जनाबाईंसारखीच आहे. शेती असून ज्यानं नागलीचं पीक काढलं नाही असा एकही शेतकरी ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळणार नाही. यंदा चांगला पाऊस झाल्यानं नागलीच्या रुपानं कनसरीचा देव प्रत्येक शेतात उभा आहे. त्यामुळे गावापाड्यातले आदिवासीही खूश आहेत.नागलीच्या पीकामुळे शेतकर्‍यांच्या शेतात देव अवतरलाय. बारा महिने खायला मिळणार असल्यानं सगळे शेतकरी आनंदात आहे. सध्या नागलीच्या पापडांना मोठी मागणी आहे. त्यातल्या 'अ' जीवनसत्वामुळे कुपोषणावरही तो रामबाण उपाय ठरतोय. त्यामुळे आता ही नागली आदिवासी लेकरांमधल्या कुपोषणावर इलाज ठरतेय. हाही कनसरीचाच आदिशिर्वाद.

close