महिला कबड्डी टीम सेमीफायनलमध्ये

March 3, 2012 5:09 PM0 commentsViews: 4

03 मार्च

बिहारमध्ये सुरु असलेल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. क्वार्टरफायनलमध्ये भारताने इंडोनेशियाचा 66-20 असा पराभव केला. पहिल्या हाफमध्ये इंडोनेशियाच्या खेळाडूंनी चांगली लढत दिली.भारताच्या खात्यात 17 पॉइंट होते. तर इंडोनेशियानंही 13 पॉईंट वसूल केले. पण दुसर्‍या हाफमध्ये मात्र भारतानं वर्चस्व गाजवलं. भारतानं तब्बल 49 पॉईंट वसूल केले. तर इंडोनेशियाला केवळ 3 पॉईंटचीच कमाई करता आली. प्रियंका नेगी आणि दिपीका जोसेफच्या जबरदस्त खेळीनं मॅच गाजवली.

close