गोव्यात विक्रमी 83 टक्के मतदान

March 3, 2012 5:59 PM0 commentsViews: 2

03 मार्च

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आज विक्रमी 83 टक्के मतदान झालं आहे. मतदारांनी सकाळपासूनच रांगा लावून मतदान केलं. काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत झालं. पणजीत काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. गोव्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे मनोहर पर्रीकर यांनीही पणजीमधल्या मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजता मतदान केलं. गोव्यात गेल्यावेळी 72 टक्के मतदान झालं होतं. यावेळी 40 जागांसाठी 216 उमेदवार रिंगणात आहेत. मतदानावर लक्ष ठेवण्यासाठी पोल मॉनिटरिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला. यात सर्व मतदारांचे फोटो आणि त्यांच्या बोटांचे ठसे कॉम्प्युटरवर नोंदवण्यात आले. अशा पद्धतीचा वापर करणारं गोवा हे देशातीलं पहिलंच राज्य ठरलंय.

गोवा निवडणुकीतले ठळक मुद्दे- मुख्य लढाई काँग्रेस आणि भाजपमध्ये – तिकीट वाटपावरून काँग्रेसमध्ये बंडखोरी- सत्ताधार्‍यांवर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचे आरोप- निवडणूक प्रचारात पैशांची 'खाण' – मतदारसंघांच्या फेररचनेचा फायदा भाजपला?- भाजपने प्रथमच दिली ख्रिश्चनांना उमेदवारी- भाजपची महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी युती- एकूण 215 उमेदवारांमध्ये महिला केवळ 9- निवडून येणार्‍या अपक्षांवर मायनिंग लॉबीचं लक्ष

close