कृपांच्या मुंबईबाहेरील मालमत्तेवर छापे ?

March 3, 2012 10:23 AM0 commentsViews: 2

03 मार्च

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईबाहेरील मालमत्तांवर छापे घातले जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईबाहेरच्या 6 ते 7 ठिकाणी छापे घातले जाण्याची शक्यता आहे. काल मुंबईतल्या 19 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्यात कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या परिवाराकडून पाच महागड्या गाड्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर आता जौनपूर आणि रत्नागिरीत छापे टाकले जाऊ शकतात.

close