दिल्ली,राजस्थानसह उत्तर भागाला भूकंपाचे सौम्य धक्के

March 5, 2012 9:24 AM0 commentsViews: 4

05 मार्च

दिल्ली, राजस्थानसह देशाच्या उत्तर भागाला थोड्याच वेळापुर्वी भूकंपाचे सौम्य स्वरुपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता 4.9 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. दिल्लीजवळील बहाद्दरगड हा भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. दिल्लीपाठोपाठ पंजाब, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दरम्यान, या भूकंपात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. पण हरियाणातील उकलाना इथं 5 नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. तर हिस्सार इथं इमारतींना तडेही गेले आहेत.

close