आयबीएन लोकमत इम्पॅक्ट: अखेर वाघोळ्यात दारुबंदी

March 3, 2012 10:56 AM0 commentsViews: 21

03 मार्च

औरंगाबाद जिल्हयातील वाघोळाच्या गावकर्‍यांनी काल रात्री दारुबंदी उत्सव साजरा केला. कारण त्यांच्या 7 वर्षांच्या लढ्याला यश आलंय. आणि त्यासाठी त्यांनी आयबीएन लोकमतचे आभारही मानले आहे. वारंवार आंदोलन करुन, निवेदनं देऊनही गावातील अवैध दारुविक्री काही थांबत नव्हती. अखेर आयबीएन लोकमतनी वाघोळा गावक-यांबरोबर या लढा आपला केला. गावातील होत असलेली दारुविक्री बंद का होत नाही, याला कोण कोण जबाबदार याची बातमी देऊन दणक्यात पाठपुरावाच केला. अखेर प्रशासन गडबडून गेलं आणि तात्काळ कारवाई करीत गावातील दारुविक्री थांबवण्यात आली.

औरंगाबाद जिल्हयातील वाघोळा गावच्या ग्रामस्थांनी गेल्या 7 वर्षांपासून दारु बंदीसाठी लढा उभारला होता. पण हा लढा पोलीस आणि सरकारी यंत्रणेच्या कृपादृष्टीमुळं पुढेचं जात नाही. अख्ख गाव विरोध करतयं पण पोलीस दारुविक्रेत्याला साथ देत होते. गावातली दारू बंद करावी अशी मागणी लावून धरली होती. स्थानिक पोलीस स्टेशन ते मंत्रालयापर्यंत सर्वांकडे दाद मागून झाली. मात्र दारू तर बंद झाली नाहीच, उलट दारूबंदीसाठी पुढाकार घेणार्‍या तरूणांंनाच दारू विक्रेत्याकडून त्रास दिला जात होता. तसेच वाघोळयातल्या ग्रामस्थांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून प्रेरणा घेतली आहे. याच गावातील स्वर्गीय शेषराव पाटील गायकवाड यांनी गावाला व्यसनमुक्त ठेवलं.

पण त्यांच्यानंतर गावात दारुचा अड्डाचं बनला आणि गावाची अर्थव्यवस्थाच कोलवडून पडली. याची सर्वात जास्त झळ बसली ती महिलांना. तंटामुक्त अभियानामार्फतही दारूबंदीसाठी प्रयत्न झाले पण दारूविक्रीला पोलिसांचंच अभय असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत पण पुन्हा तपासणी करू असं सांगत पोलीस सारवासारव करत होते.मात्र अखेर आयबीएन लोकमतने शेतकर्‍यांचा आवाज झोपेत असलेल्या प्रशासनाच्या कानापर्यंत पोहचवला. प्रशासनाने खडबडून जागे होतं तात्काळ कारवाई करत अखेर दारुविक्रेती बंद केली. प्रशासनाच्या या निर्णायामुळे गावकर्‍यांनी एकच जल्लोष केला. काल रात्री लोकनाट्य, जागर, गोंधळ आयोजित करुन आपला आनंद व्यक्त केला.

close