औरंगाबादमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक

November 22, 2008 7:49 AM0 commentsViews: 1

22 नोव्हेंबर, औरंगाबादशेखलाल शेखमका, ज्वारी, बाजरी आणि भरड या धान्यास 840 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी भाव देऊ नये असं राज्य सरकारचं परिपत्रक असतानाही ,औरंगाबाद बाजार समितीत मक्याला सहाशे ते साडे सहाशे रुपये भाव दिला जातोय. कमी भाव देणारे केंद्रच औरंगाबाद बाजार समितीत नसल्यांन शेतक-यांची आर्थिक लुट होत आहे. एवढ्या कमी भावानं पीक विकणं परवडत नसल्याचं शेतकर्‍यांचं म्हणणं आहे.हमी भाव देणारं एकही केंद्र नाही हे बाजार समितीलाही मान्य आहे. त्यावर लिलाव पध्दतीन मक्याची खरेदी विक्री केली जातं असल्याचं बाजार समितीनं स्पष्ट केलं आहे. बाजार समितीत दररोज हजार क्विंटल मक्याची आवक होते. शेतकरी मिळेल त्या वाहनात मक्याची पोती विक्रीस आणतात. मात्र व्यापारी संधीचा फायदा उठवत भाव पाडून मका खरेदी करताय. शेतक-यांची ही लूट थांबवण्यासाठी लवकरात लवकर खरेदी केंद्र सुरू करुन किमान दर तरी द्यावे एवढीच रास्त अपेक्षा शेतकर्‍यांची आहे.

close