युपीच्या प्रचाराचा खर्च काँग्रेसने जाहीर करावा – केजरीवाल

March 5, 2012 10:08 AM0 commentsViews: 1

05 मार्च

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेला खर्च काँग्रेसने जाहीर करावा अशी मागणी टीम अण्णांनी केली. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर दिग्विजय सिंग यांना थेट आव्हान दिलं आहे. निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी हेलिकॉप्टरचा वापर केला होता. त्याचाही खर्च राहुल गांधींनी सादर करावा अशी मागणी केजरीवाल यांनी केली. केजरीवाल यांच्या या मागणीचं अण्णा हजारे यांनी समर्थन केलंय. पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी टीम अण्णांची आज दिल्लीत बैठक होत आहे.

close