नोकरीपेक्षा शेतीचा मार्ग निवडणारा ‘मास्टर’सचिन !

March 3, 2012 1:54 PM0 commentsViews: 5

मनोज जयस्वाल, वाशिम

03 मार्च

शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही म्हणून रडत बसणारे हजारो तरूण आपल्या आजूबाजूला दिसतात. पण हाती आलेल्या संधीचं सोनं करणारे कमी जण असता. म्हणूनच सचिन सारडाची कथा नक्कीच वेगळी ठरते.

घरची शेती आणि नोकरीची संधी यामध्ये काय निवडशील असा प्रश्न सचिनला केला असतो तो म्हणतो, नोकरी करण्यापेक्षा घरची शेती करणे चांगले आहे. शिरपूरमध्ये घरची 11 एकर शेती, वडिलांची बायपास झालेली अशा परिस्थितीत सचिननं ग्रॅज्युएशन अर्धवट सोडलं आणि शेती करायचा निर्णय घेतला आणि त्यात तो कमालीचा यशस्वीही झाला.परंपरागत शेतीला फाटा देऊन सचिननं हळदीचं विक्रमी उत्पन्न मिळवलं. सचिनच्या निर्णयाबद्दल शंका असलेले त्याचे वडीलसुद्धा आता त्याच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत आहे. एकीकडे तरूण शहरातल्या झगमगाटाला,आयटीमधल्या जॉब्सकडे जास्तीत जास्त आकर्षित होत आहे. तर दुसरीकडे सचिननं मात्र काळ्या आईशी नाळ कायम राखत नोकरी मिळत नाही म्हणून निराश होणार्‍या तरूणांपुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.

close