भूपती-बोपन्ना जोडीने पटकावलं दुबई ओपनचं जेतेपद

March 5, 2012 10:15 AM0 commentsViews: 1

05 मार्च

महेश भूपती आणि रोहन बोपण्णा या भारतीय जोडीनं दुबई ओपन टेनिस स्पर्धेच्या डबल्सचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यांनी फायनलमध्ये फ्रास्टेनबर्ग आणि मॅटकोव्हस्की जोडीचा 6-4, 3-6 आणि 10-5 असा पराभव केला. भूपती आणि बोपण्णा या जोडीचं हे पहिलच विजेतेपद आहे. तर भूपतीचं हे 50वं जेतेपद ठरलं आहे. यंदाच्या टेनिस हंगामापासून दोन्ही खेळाडूंनी एकत्र खेळायला सुरूवात केली. याआधी चेन्नई ओपन स्पर्धेत त्यांनी सेमिफायनलपर्यंत धडक मारली होती.

close