युपीच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मुलायम सिंगच – अखिलेश यादव

March 5, 2012 10:28 AM0 commentsViews: 8

05 मार्च

मुलायम सिंग यांचा मुलगा अखिलेश यादव यानंसुद्धा मुलायम सिंग हेच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाला बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला. तसेच अखिलेश यादव हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याची चर्चा आहे. पण अखिलेश यादवनं मात्र ही शक्यता फेटाळून लावली. आणि सपाला बहुमत मिळालं तर फक्त मुलायमसिंगच मुख्यमंत्री होतील असं स्पष्ट केलंय. पक्षाचंही हेच मत असल्याचं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.

close