सोलापूरमध्ये युती तुटली

March 5, 2012 11:05 AM0 commentsViews: 1

05 मार्च

सोलापूर महापालिकेमध्ये अखेर भाजप-सेनेत मतभेद झाल्याने युती तुटली आहे. संख्याबळाच्या आधारावर स्वीकृत नगरसेवकंाच्या दोन्हीही जागांवर भाजपने दावा केल्याने ही युती तुटली असल्याचं बोललं जातंय. पक्षीय बलाबल आधारावर युतीचे 2 स्वीकृत नगरसेवक महापालिकेमध्ये निश्चित होऊ शकतात. यातील एका जागेवर सेनेनं दावा केला होता. पण याच मुद्यावरुन दोघांमध्ये तीव्र मतभेद झाले आहे. दरम्यान, युती तोडण्याचा निर्णय हा सेनेचा वैयक्तिक निर्णय असल्याचा दावा भाजपने केला आहे. दरम्यान, मागील आठवड्यातच पुण्यामध्येही युतीत मतभेदामुऴे युती तुटली.

close