मजुरांनी द्राक्ष खाल्ली म्हणून कामावरुन बडतर्फ

March 5, 2012 11:16 AM0 commentsViews: 12

05 मार्च

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या मळ्यातील द्राक्ष मळ्यात काम करणार्‍या शेत मजुरांनी खाल्ली म्हणून त्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आल्याची लाजीरवाणी घटना पुण्याच्या मांजरी इथल्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात घडली आहे. सुरेखा शेडगे, संगीता कामठे, लक्ष्मी भोसले आणि साकराबाई मदने या चार शेतमजूर महिला पुण्याच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात मागील दहा वर्षा पासून काम करत होत्या. 22 फेब्रूवारीला या चार शेतमजूर महिलांनी मळ्यातील सुरक्षा रक्षकांना विचारून दोन द्राक्षाची घळ तोंडून खाल्ली. मळ्यातील द्राक्ष खाल्ली नसून ती द्राक्ष या चार कामगार महिलांनी चोरी केल्याच्या कारणावरून या चार शेतमजूर कामगारांना त्यांच्या नोकरी वरून राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या संचालकानी बडतर्फ केले. याचा निषेध नोंदवण्याकरीता या केंद्रात काम करणार्‍या सर्व महिलांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. बडतर्फ शेतमजूरांना त्वरित कामावर रूजू करण्यात यावे अशी मागणी या शेतमजूर महिलानी केली आहे.

close