मंगळ ग्रह आज पृथ्वीच्या दारावर

March 5, 2012 12:22 PM0 commentsViews: 103

05 मार्च

सुर्यमालेतील चौथा ग्रह मंगळ आज पृथ्वीवासीयांच्या भेटीला येणार आहे. मंगळ गृह आज पृथ्वीच्या सर्वात जवळ येणार आहे त्यामुळेच तो नेहमीपेक्षा अधिक चमकदार दिसणार आहे. आणि तो पूर्वेकडे पाहिल्यास मगंळ हा डोळ्यांनी स्पष्टपणे पाहता येणार आहे. मंगळ हा तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असेसुध्दा म्हटले जाते.हा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळाला आहे. अलीकडेच शास्त्रज्ञांना मंगळवार पाणी असल्याचा दावा केला आहे. मंगळावर मोठ्याप्रमाणावर ज्वालमुखी आहे आणि आजही त्यातल्या काही जीवंत आहे. त्याचबरोबर चंद्राप्रमाणे अनेक विवरे मंगळावर आहे. मंगळावर जेंव्हा निरिक्षण करण्यात आले होते तेंव्हा कालव्याच्या खुणा आढळल्या आहेत यावरुन पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे असा अंदाज आहे. तसेच या ग्रहावर प्रचंड मोठी एक दरी आहे ती आपल्याला पृथ्वीवरुन शक्तीशाली दुर्बिणीतून सुध्दा दिसते. आज मंगळ पृथ्वीच्याजवळ येत असल्यामुळे खगोलप्रेमीसाठीही एक प्रर्वणी ठरणार आहे.

close