सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी शिवसेनेचं आंदोलन

March 5, 2012 4:05 PM0 commentsViews: 1

05 मार्च

पुण्यात महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजतोय. तरीही यावर ठोस उपाय शोधला जात नाही. महिलादिनाच्या निमित्तानं शिवसेनेनं या प्रश्नावर आंदोलन केलं. महिलांसाठी असणार्‍या सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढवावी. तसेच पाणीकपात करत असताना लोकांमध्ये पाण्याच्या वापराविषयी जनजागृती करावी या मागणीसाठी शिवसेनेनी आज आंदोलन केलं. पुण्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जाऊन त्यांनी याविषयी अधिकार्‍यांना निवेदन दिलं.

close