लाच दिल्याप्रकरणी गिडवाणींना अटक

March 6, 2012 10:35 AM0 commentsViews: 1

06 मार्च

आदर्श घोटाळयाचा तपास करत असलेल्या सीबीआयच्या पथकातल्या काही अधिकार्‍यांना आणि वकिलांना मॅनेज करण्याचा प्रयत्न आदर्श सोसायटीचे को प्रमोटर कन्हैय्यालाल गिडवाणी यांनी केल्याचं उघडकीस आलंय. गिडवाणी आणि त्यांचा मुलगा कैलास गिडवाणी याने त्यांचा टॅक्स कन्सल्टंट जे के जिग्गीयासी याला सव्वा कोटी रूपयांची रक्कम दिली. त्यातली 25 लाख रूपयांची लाच जिग्गीयासी याने सीबीआयचे वकील मंदार गोस्वामी याला दिली. ही लाच देताना सीबीआयने जिग्गीयासी आणि गोस्वामी याला रंगेहाथ पक़डलं. ही लाच गिडवाणी आणि त्यांच्या मुलावरचे आरोप सौम्य करण्यासाठी होती. तर राहिलेले 1 कोटी रूपये सीबीआयच्या काही तपास अधिकार्‍यांना वाटली जाणार होती असा संशय सीबीआयकडून व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी टॅक्स कन्सल्टंट जिग्गीयासी याला 16 मार्च पर्यंत पोलिस कोठडी तर कन्हेय्यालाल गिडवाणी , कैलास गिडवाणी आणि मंदार गोस्वामी या तिघांना 16 मार्चंपर्यंत सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली आहे. या घडामोडींमुळे आदर्श घोटाळ्याला वेगळं वळण मिळालंय.

close