आयोगाच्या चुकीमुळे पराभूत उमेदवार विजयी

March 5, 2012 4:44 PM0 commentsViews: 1

05 मार्च

उस्मानाबाद जिल्हयात निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे पराभूत उमेदवाराला विजयी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. कळम तालुक्यातील मोहा जिल्हा परिषद जागेवर शिवसेनेच्या सविता कोरे यांचा पराभव झाला. तर राष्ट्रवादीच्या दिपा माने यांना विजयी घोषित करण्यात आलं. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी जिल्हा परिषदेच्या एव्हीएम मशीन ऐवजी पंचायत समितीची एव्हीम मशीनची मतमोजणी निवडणूक कर्मचार्‍यांनी केली होती. त्यामुळे हा प्रकार घडला. पराभूत उमेदवार कोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली चौकशीनंतर ही बाब उघडकीस आली. मात्र तरीही निवडणूक अधिकार्‍यांनी न्यायालयात जाण्याचा चुकीचा सल्ला दिला. उस्मानाबाचे जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी या प्रकाराची माहिती मुंबई निवडणूक विभागाला दिली.

close