गोव्यात सत्तापालट ; काँग्रेसला धूळ चारत कमळ फुलले

March 6, 2012 11:33 AM0 commentsViews: 2

06 मार्च

गोव्यात मतदारांनी काँग्रेसला नाकारलं आहे. भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय. भाजपला यावेळी स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करता येणार आहे. तरीही युतीमध्ये असलेल्या मगोप आणि भाजपनं पाठिंबा दिलेल्या अपक्षांनाही नव्या सरकारमध्ये मानाचे स्थान मिळणार असल्याचे पर्रीकरांनी स्पष्ट केलं आहे. मनोहर पर्रीकर यांचं 9 तारखेला शपथविधी होणार असल्याचं कळतंय.

गोव्यात कमळ फुललंय सत्ताधारी काँग्रेसला हरवत तिथं भाजप स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करणार आहे. तरीही मगोप आणि सोबत असलेल्या अपक्षांनाही नव्या सरकारमध्ये मानाचे स्थान मिळणार असल्याचे मनोहर पर्रीकरांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांचा 9 तारखेला शपथविधी होण्याची शक्यता आहे

पाच वर्षं सत्तेत असलेल्या काँग्रेसला यावेळी दहाचा आकडा सुद्धा गाठता आला नाही. मायनिंग घोटाळा आणि घराणेशाहीचा काँग्रेसला फटका बसला आहे. आलेमाव कुटुंबातल्या चारही जणांचा पराभव झाला. गृहमंत्री असलेल्या रवी नाईक आणि त्यांच्या मुलालाही पराभव पत्करावा लागला.

भाजपने सहा ख्रिश्चन उमेदवारांना तिकीटं दिली होती. त्यापैकी चार जण निवडून आलेत. ख्रिश्चनांना गृहीत धरू नये, हा धडा यातून काँग्रेसला मिळाला. तर कट्टरपंथीयांपासून दूर राहणं फायद्याचं आहे, हा धडा भाजपला मिळाला. गोव्याच्या आजपर्यंतच्या राजकारणाचा अनुभव पाहता भाजपला पाच वर्षं सरकार टिकवून ठेवण्यासाठी दक्ष राहावं लागणार आहे.

close