पुण्यात नर्‍हे कॅम्पस बंद ; पालकांचा आंदोलनाचा इशारा

March 5, 2012 4:11 PM0 commentsViews: 2

05 मार्च

पुण्यातल्या सिंहगड स्प्रिंगडेल शाळेचं नर्‍हे कॅम्पस बंद होणार असल्याची नोटीस पालकांना पाठवण्यात आली आहे. मारूती नवले यांच्या सिंहगड संस्थेचीच ही शाळा आहे. विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षापासून आंबेगाव वडगाव किंवा वारजे शाखेमध्ये सामावून घेतलं जाणार असल्याचं या नोटीशीमध्ये सांगितले आहे. यामुळे संतापलेल्या पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला. पुण्याच्या सिंहगड स्प्रिंगडेलच्या नर्‍हे शाखेमध्ये जवळपास 7000 विद्यार्थी शिकतात. पहिली ते दहावी पर्यंतच्या वर्गांमधल्या या विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली.

यामध्ये पुढच्या शैक्षणीक वर्षापासून त्यांना नर्‍हेच्या ऐवजी त्यांच्या सोयीच्या कोणत्याही शाखेमध्ये जावं लागणार असल्याचं सांगण्यात आलं. नर्‍हे शाखेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शाळा शिक्षक या सगळ्याचे रुटीन असताना विद्यार्थ्यांना असं शिफ्ट केल्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणार होईल असा दावा केला आहे. त्यामुळे शाळेने हे निर्णय बदलला नाही तर तीव्र आंदोलन कऱण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सिंहगड पालक संघाच्या लोकांनी ही माहिती दिली. याबाबत शाळेशी संपर्क साधल्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीच हे पाऊल उचलत असल्याचं मॅनेजमेंट तर्फे सांगण्यात आलंय. मात्र कॅमेर्‍यासमोर काहीही माहिती द्यायला त्यांनी नकार दिला आहे.

close