‘ठाणे’दार सेनेचाच,महापौरपदी हरिश्चंद्र पाटील

March 6, 2012 11:41 AM0 commentsViews: 2

06 मार्च

अखेर ठाण्याच्या महापौरपदी महायुतीचे हरिश्चंद्र श्रीपत पाटील हे विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नजीब मुल्ला यांचा 19 मतांनी पराभव केला. हरिश्चंद्र पाटील यांना 73 मतं मिळाली. तर नजीब मुल्ला यांना 54 मतं मिळाली. तर या महापौरपदाच्या निवडणुकीत राजन किणी, अनिता किणी आणि शाहिदा कुरेशी हे तीन नगरसेवक गैरहजर राहिले. तर बेपत्ता असलेल्या भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांनी मात्र महायुतीलाच मतदान केलं आहे. दरम्यान, दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीला पाठिंबा व्यक्त करत महायुतीच्या आकडा 69 झाला त्यामुळे महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला.

ठाण्यात महापौर महायुतीचाबहुमताचा आकडा-66सेना- 53भाजप-08आरपीआय-01महायुती- 62 आता मनसेनं पाठिंबा दिल्यानं महायुती-62+मनसे 7 =69

close