धोणी कॅप्टनपद सोडणार ?

November 22, 2008 8:13 AM0 commentsViews: 21

22 नोव्हेंबरइंग्लंड विरुद्धच्या वन डे सिरीजमध्ये भारतीय टीम दमदार कामगिरी करत असताना अचानक नवा वाद निर्माण झालाय. कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने आपला राजिनामा देऊ केल्याची बातमी आहे. एका वर्तमानपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. कानपूर वन डे नंतर निवड समितीनं रुद्रप्रताप सिंगच्या जागी इरफान पठाणला टीममध्ये जागा दिली होती. हा बदल धोनीला मान्य नव्हता.धोणीला इरफान पठाण टीममध्ये नको होता. आणि आर पी सिंगच्या नावाचा आग्रह धोणी करत होता. पण निवड समितीने इरफानच्याच नावाला पसंती दिल्यावर धोणीने राजीनाम्याची धमकी दिल्याचंही या बातमीत म्हटलंय. कानपूर वन डे नंतर हा प्रकार झाला. बीसीसीआय पैकी कोणीही या बातमीला अद्याप दुजोरा दिलेला नाही

close