कृपांच्या अटकेसाठी पोलिसांकडून दिरंगाई -वाय. पी. सिंग

March 5, 2012 4:54 PM0 commentsViews: 3

05 मार्च

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्यावर कारवाईला एवढा वेळ का लागतोय, यावर आता सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पोलिसांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप माजी पोलीस अधिकार्‍यांनी केला आहे. कृपाशंकर सिंह यांच्यासंदर्भातली कारवाई ही अत्यंत धीम्यागतीने सुरु आहे. कृपाशंकर सिंह यांना अटक करण्यासाठी पोलिसांना कोर्टात जाण्याची काहीही गरज नाही, असं स्पष्ट मत माजी पोलीस अधिकारी वाय. पी. सिंग यांनी मांडलं आहे.

कृपाशंकर सिंह यांच्यावरील कारवाई ही हायकोर्टाच्या निर्देशानुसारच सुरु असल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणाशी राष्ट्रपती पुत्र असलेले काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत यांनी मात्र याच्याशी कसलाही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पण अजूनही अटकेला दिरंगाई का होतेय, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

close