काँग्रेसच्या ‘हाता’वर तुरी देऊन 2 नगरसेवकांचे पलायन?

March 5, 2012 5:15 PM0 commentsViews: 4

05 मार्च

महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात नाट्यमय घडामोडी घडत आहे. काँग्रेसच्या नगरसेविका अनिता किणी आणि कुरेशी अन्सारी या नगरसेविका आघाडीच्या गोटातून बाहेर पडल्या आहेत. लोणावळ्यातून त्यांनी पलायन केलं आहे. त्या शिवसेनेला जाऊन मिळाल्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भाजपच्या नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता प्रकरणामुळे ठाण्यातीलं राजकीय आणि सामाजिक वातावरणही चांगलंच ढवळून निघालंय. काल महायुतीनं ठाणे बंद केला होता. तर आज महामोर्चा काढण्याचं ठरवलं होतं. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. केवळ सभेला परवानगी देण्यात आली. या सगळ्या प्रकारात राष्ट्रवादी आणि भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. भाजपनं तर थेट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवरच अपहरणाचा आरोप करून तक्रार दाखल केली. एवढं सगळं होऊनही सुहासिनी लोखंडेंचा मात्र अजूनही ठावठिकाणा नाही.

close