युपीत सपाच्या हाती सत्ता ?

March 5, 2012 5:59 PM0 commentsViews: 2

05 मार्च

'कासव आणि सश्याच्या' शर्यतीच्या गोष्टी प्रमाणे यंदा उत्तरप्रदेशच्या निवडणुकीत बलाढ्य बसपाचा 'हत्ती'ला सपाची सायकल मागे टाकणार आहे. मागील निवडणुकीत बसपाने एकहाती सत्ता स्थापन केली. पण यंदा बसपाचा सोशन इंजिनिअरींगचा फंडा सर्वच पक्षांनी वापरत 'हत्ती'ला खिंडीत पकडले. आणि आजवर 'हत्ती'ने घातलेल्या धुमाकूळामुळे समाजवादी पार्टी 232 ते 250 जागा मिळवतील असा अंदाज आयबीएन नेटवर्क आणि द वीक च्या सीएसडीएसच्या सर्व्हेवरुन स्पष्ट होतं आहे. या सर्व्हेनुसार समाजवादी पार्टी बसपा, काँग्रेस आणि इतर पक्षाना धोबीपछाड देईल. बसपाला 65 ते 79 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर काँग्रेसला 36 ते 44 आणि भाजपला 28 ते 38 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.उ.प्रदेशमध्ये सायकल सुसाट

एकूण जागा – 403- सपा – 232 ते 250- बसपा – 65 ते 79- काँग्रेस+रालोद – 36 ते 44- भाजप – 28 ते 38- इतर – 11 ते 23

__________________________

पंजाबमध्ये अटीतटीची लढतएकूण जागा – 117 जागाएसआयडी+भाजप – 51 ते 63 जागा काँग्रेस -48 ते 60 जागाइतर – 3 ते 9 जागा __________________________

उत्तराखंडमध्ये काँग्रेसला कौलएकूण जागा – 70काँग्रेस – 31 ते 41 जागा भाजप- 22 ते 32 जागा _________________________

मणिपूरमध्ये पुन्हा काँग्रेसएकूण जागा – 60 काँग्रेस – 24 ते 32 जागापीडीएफ – 5 ते 11 जागाटीएमसी – 7 ते 13 जागाइतर – 10 ते 18 जागा

close