युपीत सपाची जोरदार मुसंडी

March 6, 2012 6:11 AM0 commentsViews: 2

06 मार्च

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे निकाल आता स्पष्ट होऊ लागले आहे. मतमोजणी आघाडीचं खातं उघडत समाजवादी पार्टीने मुसंडी मारत सर्वात मोठा पक्ष झाला. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने सर्वाधिक 181 जागा जिंकल्या आहे. सपाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषाला सुरूवात केली आहे. लखनौमधल्या सपाच्या कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. फटाके फोडून या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा करायला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे मायावतींच्या कार्यालयाजवळ शुकशुकटा झाला आहे. बसपाला 94 जागावर समाधान मानावे लागले आहे. 91 जागांसह बसपा विरोधी बाकावर बसले हे स्पष्ट झालं आहे. पण सपाला सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

close