मुख्यमंत्री मायावती देणार राजीनामा

March 6, 2012 7:14 AM0 commentsViews: 2

06 फेब्रुवारी

विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव स्विकारून बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपण राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहे. दरम्यान .काल संध्याकाळी विधानसभाही बरखास्त करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत बसपाला 96जागांवर समाधान मानावे लागले आहे. सत्ता कायम राखण्याचा दावा मायवती यांनी केला होता पण यंदा हत्तीला चारा खाऊ न घालण्याचा पवित्रा युपीवासीयांनी घेतल्यामुळे मायावतींना मुख्यमंत्रीपदावरुन खाली उतरावे लागत आहे. 

close