कापसाच्या निर्यातबंदीबाबत फेरविचार करण्याची शक्यता

March 7, 2012 10:19 AM0 commentsViews: 6

07 मार्च

कापसावरच्या निर्यातबंदीबाबत सरकार फेरविचार करण्याची शक्यता आहे. कापूस निर्यात बंदीच्या आदेशाचा ताबडतोब आढावा घ्या, असे निर्देश पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंत्रिगटाला दिले आहे. हा निर्णय झाल्यानंतर या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा अशा आशयाचा पत्र कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधानांना लिहलं होतं.या मुद्यावरुनच गुजरात काँग्रेसचे प्रभारी आणि महाराष्ट्रातील नेते यांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर पंतप्रधानांनी हे निर्देश दिले आहे. कापूस निर्यातबंदीसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही एका शिष्टमंडळासह पंतप्रधानांना भेटणार आहेत.

close