राज्यातच्या 3 कबड्डीपटूंना 1 कोटींचे बक्षीस

March 7, 2012 11:22 AM0 commentsViews: 12

07 मार्च

पहिलावहिला महिला कबड्डी वर्ल्डकप भारतीय टीमने जिंकला आणि कबड्डीपटू रातोरात स्टार झाल्यात. महाराष्ट्राच्या सुवर्णा बारटक्के, दीपिका जोसेफ आणि अभिलाषा म्हात्रे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातल्या 3 खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केलं आहे. याशिवाय भारतीय टीमचे कोच रमेश भेंडिगिरी यांना 25 लाख रुपयांची घोषणाही करण्यात आली आहे. बिहारच्या पाटणा इथल्या पाटलीपुत्र स्टेडिअमवर झालेल्या महिला कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने फायनलमध्ये इराणचा पराभव करत वर्ल्ड कपवर नाव कोरलं. या स्पर्धेत भारताने एकही पराभव स्विकारला नाही. भारतीय टीमच्या या विजयाच महाराष्ट्राच्या सुवर्णा बारटक्के, अभिलाषा म्हात्रे आणि दिपीका जोसेफ यांनी महत्वाची कामगिरी बजावली.

close