मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यामुळे सपाला फायदा – मायावती

March 7, 2012 11:42 AM0 commentsViews: 4

07 मार्च

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या दारुण पराभवाबद्दल मायावतींनी काँग्रेस आणि भाजपला दोष दिला. आज त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस आणि भाजपनं केलेल्या जातीय राजकारणाचा फायदा समाजवादी पक्षाला झाला, असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेस कमकुवत झाल्यानं मुस्लिमांची 70 टक्के मतं समाजवादी पक्षाला गेली, असं त्या म्हणाल्या. बहुजन समाज पक्षाच्या सरकारनं अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. त्या योजना समाजवादी पक्षाचं सरकार गुंडाळून ठेवेल आणि राज्याला मागे घेऊन जाईल, अशी टीकाही मायावतींनी केलीय.

close