बटाट्याचे भाव गडगडले

November 22, 2008 9:16 AM0 commentsViews: 5

22 नोव्हेंबरबंपर पीक आल्यावर खरंतर शेतकर्‍यांनी खूष झालं पाहिजे. यंदा मात्र कांद्याप्रमाणेच बटाट्यानंही शेतकर्‍यांच्या डोळ्यातून पाणी आणलंय. अपेक्षेपेक्षा जास्तच पीक आल्यामुळे शीतगृहात साठवलेल्या बटाट्यांबरोबरच ,बटाट्याचं नवं पीकदेखील खपवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. गेल्या वर्षी बटाट्याचं उत्तम पीक आलं आणि एवढं बंपर पीक आलं की ते शेतकर्‍यांना शीतगृहात साठवणं भाग पडलं. मात्र आता यावर्षीचा नवा बटाटा बाजारात आणायचा की साठवणीचा बटाटा या कैचीत शेतकरी सापडलेत. त्यामुळेच बटाट्यांचे भाव पडलेत. पंजाबमध्ये तर शेतकर्‍यांना, शीतगृहात दहा रुपये किलो दरानं साठवलेला बटाटा, केवळ दोन ते तीन रुपये किलो दरात विकावा लागतोय. आता तर शेतकर्‍यांना नव्या पेरणीसाठी देखील साठवणीचा बटाटा डोळ्यांसमोर नको झालाय. हा जुना बटाट्याचा माल संपल्यावर तरी नव्या पीकातल्या बटाट्याला बाजारात भाव मिळेल अशी आशा त्यांना आहे.

close