वन डे मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिश्यात

March 8, 2012 12:06 PM0 commentsViews: 2

08 मार्च

वन डे ट्राय सीरिजमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आहे. जबरदस्त चुरशीच्या झालेल्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने लंकेचा 16 रन्सने पराभव केला. बेस्ट ऑफ थ्री फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर 2-1 अशी मात केली. फायनल मॅचमध्ये पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 232 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. 5 विकेट 113 रन्स अशी श्रीलंकेची अवस्था होती. पण सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या उपुल थरंगानं तळाच्या बॅट्समनना हाताशी धरत लंकेची इनिंग सावरली. थरंगा 71 रन्स करत मॅचमध्ये रंगत निर्माण केली, पण शेन वॅटसननं थरंगाचा अडसर दूर केला आणि इथंच ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला. श्रीलंकेची इनिंग 215 रन्सवर ऑलआऊट झाली. मॅकेनं ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक 5 विकेट घेतल्या.

close