बनावट मतदार ओळखपत्रप्रकरणी गुन्हा दाखल ; दोघांना अटक

March 7, 2012 1:29 PM0 commentsViews: 1

07 मार्च

नाशिकमधल्या बनावट मतदार ओळखपत्रप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर त्यातल्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात सहभागी असलेल्या कन्हैया परदेशी आणि ठेकेदार विजय कसबे यांना पंचवटी पोलिसांनी अटक केलीय. जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केल्यावर पहाटे कारवाई करण्यात आली. तर मनसेचे पराभूत उमेदवार मिलिंद भालेराव आणि एका नगरसेवकाचे नातलग संजय बुटे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी आणि कसबे यांना 12 मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, नाशिकच्या जिल्हाधिकार्‍यांनी याप्रकरणाचा अहवाल राज्या निवडणूक आयोगाला सादर केलाय. याबाबत कठोर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलीये. मात्र प्रशासकीय कर्मचार्‍यांचा याप्रकरणातल्या सहभाग पुढे येईल का हा खरा प्रश्न आहे.

close