आयपीएस अधिकार्‍याला ट्रॅक्टरखाली चिरडले

March 8, 2012 2:58 PM0 commentsViews: 10

08 मार्च

मध्यप्रदेशमध्ये बेकायदेशीर मायनिंग थांबवण्याचा प्रयत्न करणार्‍या एका आयपीएस अधिकार्‍याला जीव गमवावा लागला. नरेंद्र कुमार असं त्यांचं नाव आहे. मोरेना जिल्ह्यातल्या भारमोरमध्ये ही घटना घडली. खाणीतून बेकायदेशीरपणे काढलेले दगड नेणार्‍या ट्रॅक्टरला अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी ट्रॅक्टरखालीच चिरडण्यात आलं. जखमी अवस्थेत त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॅक्टरच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र कुमार हे 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी आहे आणि ते मोरेनामध्ये एसडीओपी पदावर नियुक्त होते. नरेंद्र कुमार यांना अवैध उत्खनन बद्दल माहिती मिळाली होती. खाणीतून बेकायदेशीरपणे काढलेले दगड नेणार्‍या ट्रॅक्टरला अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी ट्रॅक्टरखालीच चिरडण्यात आलं. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री उमाशंकर गुप्ता यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. तसेच या प्रकरणी आरोपी मनोज केशव सिंह याच्यावर कलम 302 नुसार खटला दाखल करण्यात आला आहे. पण मनोज केशव सिंह हा या घटनेमागे एक मोहरा आहे पण यामागे असलेलं रॅकेट पकडण्यात सरकारचे हात पोहचतील की नाही.

close