…शिमगो इलो रे !

March 7, 2012 10:59 AM0 commentsViews: 60

07 मार्च

कोकणात होळी अर्थात शिमगोत्सव उत्साहात साजरा केला जातो. शिमग्याच्या पालख्या काढून त्या घरोघरी नाचवल्या जातात. गावदेवीची ही पालखी उत्साहात गावातल्या घराघरांत नाचवली जाते. नोकरीसाठी गावापासून लांब असलेले चाकरमानी या शिमगोत्सवात अगदी आवर्जून सहभागी होतात. जाती नि-या गावातील नवलाई,पावणाईची पालखी भावाच्या भेटीला निघाली आहे.अनेक वर्षांची परंपरा या पालखी उत्सवाला आहे. रात्री उशीरापर्यंत ही पालखी रत्नागिरीचं ग्रामदैवत भहिरी देवाच्या मंदिरात पोहोचेल. चुरमाड साणेवर उभं केल्यानंतर या भाऊ बहिणींची भेट होते अशी या पालखी भेटीची आख्यायिका आहे.या पालखीनंतरच कोकणातल्या होळीला सुरुवात होते.

close